You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या कामाचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले कौतुक…

आ. नितेश राणे यांच्या कामाचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले कौतुक…

आम राणे यांच्या कार्यातून दिसला राष्ट्र आणि समाजाप्रतीचा अंतरभाव

कणकवली :

संकटाच्या काळात राष्ट्र आणि समाजाप्रती असलेला अंतरभाव आमदार नितेश राणे यांच्या कार्यातून दिसला आहे.असे गौरवोद्गार आदर्शगाव हिरवेबाजरचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.सिंधुदुर्ग जिल्हयातील सरपंच,सदस्य यांच्या झूम अँप वरील आयोजित मिटिंग मध्ये ते मार्गदर्शन करत होते तेव्हा चर्चे दरम्यान त्यांनी आम.नितेश राणे यांच्या कार्याचे कौतुक केले.

“पुढारी जसा वागतो तसे लोक गावागावात वागतात..”असे संत गाडगेबाबा म्हणत असत आज राजकीय नेतृत्वाने संकटाच्या काळात कसे वागले पाहिजे याचा आदर्श आम.नितेश राणे यांनी घालून दिला आहे. जे जे केले पाहिजे ते  ते आमदार नितेश राणे करतात.राष्ट्र आणि समजा विषयी त्याच्या मनात आलेला अंतरभाव त्याच्या कृतीतून,आणि  कार्यातून दिसतो आहे.असे गैरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले. आता गावपातळीवर सरपंच म्हणून आपली जबाबदारी आहे.पुढाकार घेऊन कोरोना पासून गाव मुक्त करण्याची, त्यासाठी लागणारे इतर सहकार्य आमदार नितेश राणे तुम्हाला करतील आणि मी मार्गदर्शन करण्यासाठी कधीही उपलब्ध राहीन असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा