You are currently viewing अणुऊर्जा प्रकल्पावर संभ्रम कायम; कोकणात प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट घोषणा करावी

अणुऊर्जा प्रकल्पावर संभ्रम कायम; कोकणात प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट घोषणा करावी

अणुऊर्जा प्रकल्पावर संभ्रम कायम; कोकणात प्रकल्प होणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट घोषणा करावी

अदानी, रिलायन्स, एनटीपीसीसोबत सामंजस्य कराराची मुख्यमंत्र्यांची माहिती; सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील जनतेचा संभ्रम दूर करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट करावी, मनसेचे कुणाल किनळेकर यांची मागणी

सिंधुदुर्ग

अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसीसारख्या कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने सामंजस्य करार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी विधानसभेत दिल्यानंतर कोकणातील जनतेमध्ये पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात कोणत्याही ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट घोषणा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून करून घ्यावी, अशी मागणी मनसेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
देवगड तालुक्यातील काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काही गावांतील नागरिकांनीही या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत कोकणच्या पर्यावरणाला धोका निर्माण करणारा कोणताही प्रकल्प प्रस्तावित नसल्याचे सांगितले होते.
मात्र, विधानसभेत मुख्यमंत्री यांनी अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या परस्परविरोधी विधानांमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे किनळेकर यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडसह संपूर्ण कोकणातील कोणत्याही जिल्ह्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार नाही, अशी स्पष्ट घोषणा करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

_________________________
*संवाद मीडिया*

*पावसाळ्यात सांधेदुखी, अंगदुखी, पाठदुखी वाढतेय का? 🤕*

*आजच सहभागी व्हा*
*🌧️ मान्सून पंचकर्म महोत्सव*
*माधवबाग कुडाळ क्लिनिक आयोजित 🌿*

*✅ पूर्ण पंचकर्म उपचार*
*(स्नेहन + स्वेदन + बस्ती)*
*💰 फक्त ₹999/- (~₹2000/-)~*

*🎯 पंचकर्माचे फायदे:*
*✔️ सांधे व स्नायूंना आराम*
*✔️ शरीरशुद्धी*
*✔️ वातदोष नियंत्रण*
*✔️ ताणतणाव कमी*
*✔️ शरीर हलके व ताजेतवाने*

*🎁 सोबत मोफत पावसाळी आयुर्वेदिक रेसिपी पुस्तक*

*👥 फक्त 50 व्यक्तींसाठी मर्यादित*

*शिबिर कालावधी: १ जून ते 30 जून*

*📍 माधवबाग कुडाळ क्लिनिक*

*📞 नाव नोंदणीसाठी: 9371621952*

*⏳ जागा मर्यादित आहेत. आजच आपली नोंदणी करा!*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207580/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा