You are currently viewing मळगाव खानोलकर वाचन मंदिरची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
Oplus_16908288

मळगाव खानोलकर वाचन मंदिरची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

मळगाव :

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव या संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 28 जून 2026 रोजी संस्था अध्यक्ष श्री. महेश खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेच्या सुरुवातीस कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून वर्षभरातील उपक्रमांचा आढावा मांडला. यावेळी वाचन मंदिराचे पहिले अध्यक्ष दिवंगत सूर्यकांत सावळाराम मळगांवकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सभेत संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासह, वार्षिक सभेची सूचना डिजिटल माध्यमातून सभासदांना पाठविण्याच्या ठरावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

माजी कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, आजीव सभासद प्रा. सुभाष गोवेकर व अँतोन फर्नांडिस यांनी ग्रंथालयाच्या कार्याचे कौतुक करून मौलिक सूचना केल्या. “ग्रंथालय जिल्ह्यात आदर्श असून गावाला याचा अभिमान आहे,” असे मत यावेळी व्यक्त झाले. सौ. स्नेहा खानोलकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा