*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*वटपौर्णिमा व पर्यावरण*
रखरखीत उन्हाळा संपतो आणि चराचराला वेध लागतात पावसाचे हवा बदलते. अधुनमधून वळवाच्या पावसाच्या सरीही ओघळतात.. पहाटे पासूनच पावशा पक्षी शेतकऱ्याला साद घालू लागतो मग शेतकरीही घाईगडबडीने पेरणीची तयारी करतो. बघता बघता झाडं, वेली, नव्या लाल पोपटी पर्णसंभाराने नटू लागतात. अवघा निसर्ग आनंदाने डोलत वर्षाराणीची आतुरतेने वाट बघत असतो. अशा सुरेख समयी डौलदारपणे येते ज्येष्ठपौर्णिमा–
वटपौर्णिमा.. समस्त महिलांचा एक आनंदाचा पारंपारिक सण…
या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. सात जन्माचे प्रतिक म्हणून सुताचे सात धागे वडाभोवती गुंडाळून हाच पती सात जन्म मिळो अशी त्याची प्रार्थना करतात.
काल वटपौर्णिमा झाली व पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो..
आपल्या पूर्वजांनी मानवी आयुष्यातले निसर्गाचे महत्व ओळखून त्याची पूजा सुरु केली… पंचमहाभूतामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी जन्माला आली आणि ती वाढली..अनादिकालापासून मानवाने वृक्षांबद्दल प्रेम बाळगले. वृक्ष मानवाचा मित्र आहे. दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहे. लोककथांमधून वृक्ष आणि मानवाचे हे मैत्र फार लोभसपणे व्यक्त होते..
निसर्गात फुलणार्या वृक्षजातींची संख्या हजारांत आहे पण त्यातल्या मोजक्याच वृक्ष जातींना आपल्या संस्कृतीत देवतेचे स्थान मिळाले..षत्याच्या
पाठीमागे निश्चित असा अभ्यास आहे… तुळस, कडुनिंब, औदुंबर, पळस, वड, पिंपळ, माड, केळी, आपटा असे अनेक वृक्ष महाराष्ट्रात धार्मिक-
सांस्कृतिक महत्त्व लाभलेले. त्यांच्या प्रत्येक फांदीवर इथल्या सण – उत्सव-
समारंभाचे आणि एकूणच आठवणींचे पक्षी विसावलेले आहेत…
महाराष्ट्राची लोकगीतं, काव्य, लोककला, भाषा समृद्ध करण्यात या प्रत्येक वृक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे… अश्या अनेक वृक्षसंपदा पैकी वड ही एक वृक्षसंपदा..
वड हा मोठा वृक्ष आणि त्याचे कामही तितकेच मोठे. अगदी प्राचीन काळापासून हा वृक्ष मानवाला सेवा, सुविधा व सोबत देतोय आणि आजही देत आहे..! त्याच्या विषयी एक पौराणिक कथाही सांगितली जाते.. ती सर्वांनाच माहीत आहे.. सत्यवान सावित्रीची
गोष्टीतील पौराणिक भाग सोडला तर वटवृक्ष हा शुद्धीकरणाचे फार मोठे काम करुन आपल्या सौभाग्याचे रक्षण करत तर आहेच पण रोज शेकडो लिटर पाणी बाष्प हवेत सोडून हवेतला कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतो व हवेत ऑक्सिजन सोडतो. प्रदूषण नष्ट करुन हवा शुध्द करण्याचा तो एक मोठा कारखानाच आहे म्हणा ना.! म्हणूनच तर तो वंदनीय आहे. वडाचे इतरही भाग उपयुक्त आहेत बरं..! याच्या पारंब्याचा केशवर्धक तेलामध्ये उपयोग केला जातो… सूज आलेल्या भागावर वडाची पाने, कोमट करुन त्याला गोडेतेल लावून बांधल्याने सूज कमी होते. वडाखालची पहिली माती काढून त्याखालील माती घेऊन त्यात झाड लावल्यास झाडे चांगली येतात. मायेने पसरलेल्या मोठमोठ्या फांद्यावर पाखरे घरटी करतात व याची लाल फळे खातात. याच्या दाट सावलीत माणसं, गुरं ढोर विसावतात… विसावा घेतात
याच्या जाडसर पानांवर तांदळाच्या साल पापड्या करतात तर चैत्र गौरीच्या, हळदी कुंकवाच्या वेळी खेडोपाडी वडाच्या पानावर कैरीच्या डाळीची खिरापत देण्याची पद्धत होती.
वटवृक्ष हा तसा मोठा वृक्ष असल्याने तो सहसा घराच्या अंगणात किंवा परसबागेत दिसत नाही त्याचा विस्तार मोठा असल्याने त्याला जागाही भरपूर लागते. त्यामुळे तो गावाबाहेर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला, शेतात, बखळीत दिसून येतो.. याच्या पारंब्या जमीनीत जाऊन त्यांची नवीन झाडे तयार होतात. त्यामुळे भरपूर मोकळी जागा असेल तर वडाचे एक फार मोठे कुटुंबच तयार होते. जंगलात तर वटवृक्षांची अशी मोठमोठी कुटुंबे आपणास पहावयास मिळतात.. राजस्थानमध्ये पर्यावरणाचे महत्व लोकांना
समजले आहे. राखी पौर्णिमेला तर तिथल्या स्त्रिया झाडाला राखी बांधतात आणि कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्याचे रक्षण व संगोपन ही करतात.
जंगलांचे रक्षण करण्याकरता देशाच्या अनेक भागात देवराया आहेत तिथले एकही झाड कोणीही तोडत नाही…
आपली जंगल संपत्ती जपण्याचा पूर्वजांचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे. चिपको सारखे आंदोलन करुन जागृत समाज सेवकही या कामात मदत करत आहेत. आपले सरकारही आता जंगलाला अभय देत आहेत.. पर्यावरण दिन आठवडाभर साजरा करतात आणि आहेत ही
दरवर्षी हजारो झाडे लावण्याचा संकल्प होतो आणि वृक्षारोपण केले जाते. पण अजुनही त्यांचे रक्षण, संगोपन व्हायला हवे तसे होत नाही. या कामात सरकार बरोबर आपणा सर्वाचा सहभाग ही असायला हवा.!
आपल्याला शुद्ध हवा देण्यासाठीच प्रदूषण हटवण्यासाठी आपल्याला हा आपला वृक्षमित्र जपला पाहिजे, जगवला पाहिजे. सरकारच्या “झाडे लावा, झाडे जगवा’ या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे. औद्योगीक प्रगती, चैनी विलासी, भोगवादी संस्कृतीचे अंधानुकरण, बदलणारी जीवनपद्धती त्यामुळे होणारी प्रचंड वृक्षतोड, शहरात व आसपास उभी राहणारी सिमेंटची जंगले त्यामुळे आपला हा उपयुक्त मित्र आपणच आपल्या हाताने नष्ट करुन टाकतोय… आता वेळ आली आहे राजस्थान प्रमाणे आपणही सगळ्यांनी एकजुटीने या वृक्षराजीला प्रेमाचे धागे बांधून त्यांचे संरक्षण, संगोपन करण्याची नाहीतर एक दिवस ही हिरवी निसर्ग संपत्ती नष्ट होऊन माणूस प्रदुषणाच्या विळख्यात आणखीन सापडेल..
निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक तरी झाड लावण्याचा, वाढवण्याचा संकल्प करु या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सुंदर, शुद्ध हवेशीर, प्रदुषणमुक्त देश निर्माण करुन ठेवू या.. मात्र झाडे लावताना वड, पिंपळ, कडुलिंब, बाभळ यासारखी देशी झाडेच लावावीत बरं..!
संस्कृतीमध्ये जेव्हा एखादा वृक्ष स्थान मिळवतो तेव्हा केवळ त्याची उपयुक्तता हा एकमेव घटक त्यामागे नसतो तर त्या झाडाचं देखणेपण, त्याच्यातल्या काही थक्क करून टाकणार्या गोष्टी या सगळ्याच प्राचीन कालापासून मानवाला मोहात पाडत आलेल्या असतात..!!
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे @
9870451020
_________________________
*संवाद मीडिया*
*संपूर्ण कोकणात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा व 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*
*(Affiliated to MUHS, Nashik,MSBNPE,Mumbai and Approved by INC,MNC,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये *नर्सिंग* करण्याची सुवर्ण संधी
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*
🔸 *कोर्सचे नांव-*
*👉(BSc Nursing)* *”बी.एस्सी. नर्सिंग”*
*College Code-09196*
Eligibility- 12th Sci
(PCB) & NURSING
CET
• Duration : 4 Years
*👉(P.B.B.Sc Nursing)”पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग”*
• Eligibility- GNM Pass
• Duration : 2 years
*👉(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*👉(ANM)ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी*
• Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years
*⏺️अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*सर्व मुलींना १००% ट्युशन आणि परीक्षा फी माफी.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747/ 9420156771/7887561247*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204234/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
