You are currently viewing वृत्त..महाराष्ट्र 

वृत्त..महाराष्ट्र 

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ गझलकार डॉ.शरयू शहा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

वृत्त..महाराष्ट्र 

मात्रा २ ८ ८ ८ ३

 

होते जर का तुला *कसेसे* मग आणू कुठून तज्ञ

आजार तुझा हा कुणा कळेना गेले थकून तज्ञ

 

ना पुस्तकातही कोठे उत्तर मग औषध कोठून

या आजारावर किती आणले इथून तिथून तज्ञ

 

होमिओपथी आणि आयुर्वेद ॲलोपथी नि वैद्य

सर्व जाहले पण भेटलाच ना कोठे अजून तज्ञ

 

बघ आता नाही उरला कोणी तुला ठीक करण्यास

तेव्हा मिळेल उपचार खरा जो बनेल शिकून तज्ञ

 

नक्की उत्तर या *कसेसेवरी* घडेल जादू छान

जर तुझी तूच जगता आनंदे स्वतःच बनून तज्ञ

 

डॅा.शरयू शहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा