You are currently viewing विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग दौरा…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सिंधुदुर्ग दौरा…

सिंधुदुर्गनगरी 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे दिनांक 24 व 25 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

       शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर 2020 रोजी सायं. 6.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन, राखीव व मुक्काम.

       रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह ओरस येथून वागदे, ओसरगाव ता. कणकवली कडे प्रयाण, सकाळी 9.00 वा. वागदे ता. कणकवली येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी, सकाळी 9.30 वा. ओसरगाव, ता. कणकवली येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहणी, सकाळी 10.00 वा. ओसरगाव, ता. कणकवली येथून शासकीय वाहनाने ओरसकडे प्रयाण, सकाळी 10.30 वा. ओरस येथे आगमन व जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय, येथे चर्चा. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरस, येथे पत्रकार परिषद, दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरस येथे रोखीव. दुपारी 1.00 वा. ओरस येथून पावशी ता. कुडाळकडे शासकीय वाहनाने प्रयाण, दुपारी 1.30 वा. पावशी ता. कुडाळ येथे आगमन व तेथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी. दुपारी 2.00 वा. पावशी, ता. कुडाळ येथून शासकीय वाहनाने गोवाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =