You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे वीज वितरण ग्राहक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी येथे वीज वितरण ग्राहक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सिंधुदुर्ग नगरी मंडळ आयोजित तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व सिंधुदुर्गनगरी व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने मंगळवारी महावितरण कार्यालय येथे शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक, व घरगुती वीज कनेक्शन अडचणी बाबत पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी प्रथमच वीज वितरण ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात वीज बिलांबाबत तक्रारी बंद असलेले पथदीप वाडीव वीज बिले कमी दाबाचा विद्युत पुरवठा महावितरणच्या विविध योजना या आणि अशा अनेक तक्रारींचा तात्काळ निकाल करण्यात आला घरगुती व्यावसायिक, औद्योगिक, व शेतकरी ग्राहकाने आपल्या मनातील शंका कुशंका गैरसमज तक्रारी मांडून निरासन केले यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष छोटू पारकर पांडू मालवणकर प्रशांत राणे सुशील निबरे अधीक्षक कार्यकारी अभियंता विनोद विपर रोज व्यापारी संघाचे सदस्य पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 16 =