You are currently viewing कुडाळ येथे २२ रोजी वैद्यकीय तपासणी शिबिर

कुडाळ येथे २२ रोजी वैद्यकीय तपासणी शिबिर

कुडाळ :

येथील डॉ. नंदन सामान्यांच्या ओम कर्तव्य साधना हॉस्पिटलमध्ये २२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत तज्ज्ञ सर्जन्स यांच्या उपस्थितीत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची तपासणी विविध आजारांवरील तज्ज्ञ करणार आहेत. डॉ. सागर कोल्हे (मूत्र विकार), डॉ. गिरीशकुमार चौगुले (पोटाचे विकार व अन्य विकार),डॉ. दत्तात्रय ठाकूर (हाडांचे विकार) ,डॉ. मुकुंद अंबापुरकर (मेंदू विकार) , डॉक्टर नेहा पावस्कर (नेत्रनिदान तज्ज्ञ )हे तपासणी करणार आहेत. डॉ. अंबापुरकर यांच्या तपासणी शुल्कात ६० टक्के सवलत दिली जाणार आहे. अभिनवनगर कुडाळ येथील रुग्णालयात किंवा दू.क्र. (०२३६२) २२२१०५, मोबा-९४२३८८४३४२ या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिबिरातील एक्सरे, रक्त, लघवी व इतर आवश्यक चाचण्यांवर २० टक्के सवलत दिली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा