You are currently viewing राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण शिबिराच उद्या उद्घाटन..!

राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण शिबिराच उद्या उद्घाटन..!

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा अॅॅक्वेटिक फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग मार्फत सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये 1 जानेवारी पासून तीन महिन्याचे राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे शिबिराचे उदघाटन शुक्रवार १ जानेवारीला दुपारी 4 वाजता जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे. जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फेडरेशन कडून देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलतरणपटूना चांगले प्रशिक्षण मिळावे. येथील मुले राष्ट्रीय पातळीवर चमकावीत, या उद्देशाने दि अक्वेटिक फेडरेशनमार्फत 1 जानेवारी ते 31 मार्च पर्यत राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेते जलतरणपट्टू व फेडरेशनचे पदाधिकारी आदित्य सांगवेकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आॅलंपियन सौरभ सांगवेकर प्रशिक्षण देणार आहेत. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणात या ठिकाणी बंगलोरवरून राष्ट्रीय स्तरावरील जलतरण सहाय्यक प्रशिक्षक कृष्णा निशद मार्गदर्शन करणार आहे.

येथील जलतरण पट्टू राष्ट्रीय – आंतरराषट्रीय पातळीवर पदक विजेते होवोत . यासाठी राज्य स्तरापर्यंत पोचलेल्या जलतरणपटूनां प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी आतापर्यंत 25 जणांनी नोंदणी केली आहे अजूनही काही जलतरणपटू असतील तर त्यांनी फेडरेशनकडे नाव नोंदणी करून प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

शुक्रवार दिनांक 1 जानेवारीला दुपारी 4 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलाव येथे राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षनाचे उदघाटन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते केले जाणार असून जिल्ह्यातील जलतरणपटूनी उपस्थित रहावे असे आवाहन अक्वेटिक फेडरेशनच्या वतीने कार्यकारी संचालक रामदास सांगवेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =