You are currently viewing संदेश पारकरांसोबत ५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ?;

संदेश पारकरांसोबत ५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ?;

संदेश पारकरांसोबत ५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश ?; कणकवली तालुका होणार शिवसेनामय

सर्व पक्षांतील सरपंच, उपसरपंचांसह आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा सहभाग; अजित नाडकर्णी यांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

कणकवली :

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशानंतर कणकवली तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. संदेश पारकर यांच्यासोबत तब्बल ५ हजार कार्यकर्ते विविध पक्षांतून प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या प्रवेशामध्ये सर्व पक्षांतील सरपंच, उपसरपंच तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार असल्याचे बोलले जात आहे.
संदेश पारकर यांनी गेल्या अनेक वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची फळी उभी केली असून, त्यांच्या निर्णयामुळे कणकवली तालुका शिवसेनामय होईल, असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. संदेश पारकर यांच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत व अभिनंदनही केले असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना “वेट अँड वॉच”ची भूमिका घेतली आहे. फोंडाघाट एज्युकेशन संस्थेचे माजी खजिनदार, अर्बन बँकेचे संचालक तसेच कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य असलेल्या नाडकर्णी यांनी सांगितले की, “नगराध्यक्ष संदेश पारकर यांना कणकवलीचा विकास साधायचा असेल, तर सत्तेत जाणे क्रमप्राप्त आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा