You are currently viewing मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप
Oplus_16908288

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम

सावंतवाडी / (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना छत्री वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या माध्यमातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

यावर्षी वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा संदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. त्यानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या उपयोगी पडाव्यात या उद्देशाने छत्रींचे वितरण करण्यात आले. अलीकडील पावसामुळे बळीराजासमोर निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बांदा येथे झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय भाजपचे पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा