You are currently viewing भालचंद्र महाराज संस्थांनचे विश्वस्त सदानंद बांबूळकर यांचे निधन

भालचंद्र महाराज संस्थांनचे विश्वस्त सदानंद बांबूळकर यांचे निधन

कणकवली

बाजारपेठेतील रहिवासी सदानंद विठ्ठल बांबूळकर (वय ८०) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. कणकवली काशीविश्वेश्वर देवस्थानचे सचिव व भालचंद्र महाराज संस्थांनचे विश्वस्त होते. शहरातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.त्यांचा स्वभाव मनमिळावू व शांत होता. आंबेआळीत त्यांचे किरणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,दोन मुली असा परिवार आहे. हेमंत व प्रसाद बांबूळकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी कणकवली येथील स्मशानभूमती अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 2 =