You are currently viewing टेंबवली येथे घराचे पत्रे वाऱ्याने फुटून सुमारे 45 हजाराचे नुकसान

टेंबवली येथे घराचे पत्रे वाऱ्याने फुटून सुमारे 45 हजाराचे नुकसान

टेंबवली येथे घराचे पत्रे वाऱ्याने फुटून सुमारे 45 हजाराचे नुकसान

देवगड

देवगड तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे टेंबवली येथील चंद्रकला केशव राणे यांच्या घरावरील छप्पराचे पत्रे वाऱ्याने उडून फुटल्याने आणि सुमारे 45 हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. तालुक्यात शुक्रवारी सुमारे 30 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आतापर्यंत देवगड तालुक्यात एकूण 1483 किलोमीटर पाऊस झाला आहे.

 

तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच भूमिगत विद्युत वाहिनी साठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फाचरामध्ये पाणी गेल्याने हे रस्ता काही ठिकाणी खचलेल्या दिसत आहे त्यामुळे वाहतूक विषयी अडथळा निर्माण होतोय मात्र सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला असून शेतीयुक्त पाऊस असून तालुक्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा