You are currently viewing 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार

 सिंधुदुर्गनगरी

शारीरिक व आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यावर्षी 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, एनसीसी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने  दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 8 ते 8.45 वाजता जिल्हा क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), सिंधुदुर्ग येथे मुख्य योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन. सी. सी., एन. एस. एस., स्काऊट व गाईड, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी सुध्दा आपआपल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार साजरा करावा तसेच आंतराष्ट्रीय योग दिनाच्या प्राटोकॉल बाबतची सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा