You are currently viewing वैभववाडी पंचायत समितीकडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम
Oplus_16908288

वैभववाडी पंचायत समितीकडून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

ग्रंथालय उद्घाटनाने कार्यक्रमांना प्रारंभ; १८ ते २३ जूनदरम्यान ग्रामपंचायती, शाळा, महिला बचत गट व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सन्मानासह विविध सामाजिक उपक्रम

वैभववाडी / प्रतिनिधी :

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती वैभववाडीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांची सुरुवात पंचायत समिती कार्यालयातील ग्रंथालयाच्या उद्घाटनाने आणि वृक्षारोपण कार्यक्रमाने करण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी श्रीमती माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, संतोष टक्के तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच पंचायत समिती वैभववाडीच्या वतीने १८ जून रोजी लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप, भजनी कलाकारांना मंजुरी आदेश वाटप, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील सहभागी ग्रामपंचायतींचा सन्मान, तसेच अमृत महा आवास अभियानात विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात येणार आहे.

याचबरोबर सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार प्राप्त करुळ ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या शाळांचाही सन्मान केला जाणार आहे.

बालस्नेही पंचायत अभियानात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुसूर ग्रामपंचायतीचा तसेच आदिशक्ती टीमचा गौरव करण्यात येणार आहे.

२२ जून रोजी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान करण्यात येईल. तर २३ जून रोजी लोरे नं. १ रजेश्वर उद्यान येथे १२ दिव्यांग विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांची माहिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा