You are currently viewing धुरंधर, दर्यादिल,नेते Advocate दिलीपजी नार्वेकर यांचा आज जन्मदिवस,,,,,,

धुरंधर, दर्यादिल,नेते Advocate दिलीपजी नार्वेकर यांचा आज जन्मदिवस,,,,,,

धुरंधर, दर्यादिल,नेते Advocate दिलीपजी नार्वेकर यांचा आज जन्मदिवस,,,,,,🎂💐

सावंतवाडी शहरावर अनेक वर्षे नगरपालिके च्या माध्यमातून जबरदस्त राजकीय पकड असलेले एक दिलदार नेते,, गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे राजकारणात सक्रिय असलेले हे कुशाग्र बुद्धी चे राजबिंडे व्यक्तिमत्व लाभलेले दिलदार नेतृत्व,,,,,,,19985 ते 1995 हा काळ नार्वेकरांच्या कुशल नेतृत्वा चे झंझावाती दशक होते,, नार्वेकर हे नुसत्या राजकारणातच नव्हे तर अनेक सामाजिक संस्थावर सक्रिय आहेत,,ज्या कुटुंबाचा 100 वर्षे वकिली पेशा चा इतिहास आहे,, असे जिल्ह्यातील अग्रणी वकील असुन,,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या आयुर्वेदिक कॉलेज चे ते विद्यमान अध्यक्ष आहेत,,,, दिलीप नार्वेकर ह्या नावा शिवाय राजकीय क्षेत्रात सावंतवाडी हे नांव बेचव असल्यासारखं वाटतं,,,, एवढा करिष्मा आजही दिलीप नार्वेकरांचा आहे,,,!!!!
कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहावे हे दिलीप नार्वेकर यांचे कडुन शिकावे,,,!!याचे एक उदाहरण मुद्दाम नमुद करावे लागेल,,,,,,,1989 साल च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला होता, तेव्हा राजापूर लोकसभा मतदार संघांचे काँग्रेस चे उमेदवार श्रीमंत शिवराम राजे भोसले होते आणि जनतादला चे उमेदवार प्रा मधु दंडवते होते,, दोघांमध्ये थेट लढत होती,,, आम्ही युवक काँग्रेस चे कार्यकर्ते अत्यंत जोरदार पणे राजे साहेबांचा प्रचार करत होतो,त्यावेळी आजच्या सारखी कोणतीही संसाधने नव्हती,,,, टेम्पो किंवा जीप गाडीवर भोंगा लाऊन माईक हातात घेऊन प्रचार करणे हा सर्वच राजकीय पक्षाचा एक कार्यक्रम असायचा,,,,तेव्हा आम्ही वीस बावीस वर्षे वयाचे होतो,, आणि एका सकाळीच मी, अभय पंडित, आनंद परुळेकर, मिलिंद सुकी, बंड्या कुलकर्णी व इतर काही युवक काँग्रेस चे कार्यकर्ते टेम्पो मध्ये बसुन मिलिंद सुकी च्या घरी टेम्पोला झेंडा व स्पीकर बांधत होतो आणि त्याचवेळी आमच्या बाजूने जनतादला च्या प्रचारचा टेम्पो प्रचार करत गेला, त्यांच्या टेम्पो मध्ये तरुण तरुणी कार्यकर्ते आपल्या पक्षा च्या घोषणा देतं जात होते, आम्हाला पाहुन त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली,,, ह्या घोषणाबाजी मध्ये आमचे उमेदवार श्रीमंत राजे साहेबांच्या बद्दल वाईट घोषणा दिल्या गेल्या ,, म्हणून आम्ही चिडून जाऊन त्यांचा टेम्पो अडवून त्यांना मारले व तेथून आम्ही शिरोडा येथे प्रचाराला निघालो,,,,,, त्याकाळी फक्त टेलेफोन सोडून संपर्काची कोणतीच साधने नव्हती, दरम्यान हि मारामारी ची बातमी जनता दला च्या सावंतवाडी कार्यालयात पोचली, आणि त्या कार्यालयातील पुढाऱ्या नी,,,,, ” काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी जनता दला च्या महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केला ” अशी खोटी बातमी संपुर्ण राजापूर मतदार संघात पसरवून राजकीय लाभ उठवण्या साठी वातावरण तापवले, याची आम्हाला सूतराम कल्पना नव्हती,,,,!!! ह्या विनयभंग झाल्या च्या खोट्या बातमीने संपूर्ण वातावरण तंग झाले आणि आम्हा पाच जणांना शोधण्यासाठी जनता दला चे कार्यकर्ते आक्रमक होऊन सगळीकडे आमचा शोध घेऊ लागले, अशा आणीबाणी प्रसंगी आम्ही शिरोडया वरून पळून वेंगुर्ला काँग्रेस कार्यालयात गेलो,, तेथील नेत्यांनी,, तुम्ही सावंतवाडी ला ताबडतोब निघा तुमच्यामुळे वातावरण बिघडले आहे असे दरडावून आमची गाडीची व्यवस्था केली,, आणि दिलीप नार्वेकरांना फोन करून परिस्थिती चे गांभीर्य कळवले,,,,!!!!
अशा गंभीर परिस्थितीत दिलीप नार्वेकर
एक ट्रक भरून सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन निघाले ( त्यावेळी मधु लाखे यांची संपूर्ण फौज नार्वेकर साहेबांच्या सोबत असायची ) आम्ही शिरोडा मार्गे मळेवाड मध्ये पोचलो असता,, समोर दिलीप नार्वेकर आणि सर्व फौजफाटा बघुन केविलवाण्या अवस्थेत असलेल्या आमच्या मध्ये मध्ये हत्ती चे बळ आले,,,,,,,, आम्ही सर्वजण सावंतवाडी ला निघालो ,,,,येई पर्यंत नार्वेकरांच्या आक्रमक स्वभावा प्रमाणे वाटेत विरोधकांचे जे काय नुकसान करायचे ते झालेच,,,,,,!! सावंतवाडी गांधी चौक येथील काँग्रेस कार्यालयात सर्वजण जमलो,,,, जसजशी संध्याकाळ वाढत गेली तसतसे जिल्ह्यातील जनतादलाचे हजारो कार्यकर्ते गांधी चौक च्या दिशेने जमु लागले,,,,,,, दिलीप नार्वेकर काँग्रेस चे नेतृत्व करत असल्यामुळे साहजिकच जनतादला च्या टार्गेट वर दिलीप नार्वेकर आले !!!
रात्री आठ वाजेपर्यंत जनतादलाचे सुमारे आठ ते दहा हजार कार्यकर्ते सर्व तयारीनिशी जमले त्यांचे नेतृत्व तत्कालीन आमदार पुष्पसेन सावंत करत होते दरम्यान प्रचंड पोलीसफाटा पण तैनात झाला होता,,,,,,,उपस्थित जमावावतून दिलीप नार्वेकर यांना ताब्यात द्या अशी जोरदार मागणी होऊ लागली आणि कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे पोलिसांनी 144 कलम जाहीर केले,,,,,,!!
आम्ही दहा,वीस कार्यकर्ते कार्यालयाच्या माडीवर पुढे काय घडेल ह्या काळजी ने निशब्द होतो अशा कठीण प्रसंगी दिलीप नार्वेकर,,व सतीश दुभाषी हे सर्वाना धीर देतं होते,,पण आम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांचा नार्वेकरांवर पुर्ण विश्वास होता,, त्यावेळी मोबाईल किंवा संपर्काची कोणतीही साधने नव्हती आणि खाली जमाव आक्रमक झाला होता,,, जेव्हा जमाव चाल करून आला त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास भोसले आणि आमदार पुष्पसेन सावंत यांचे मध्ये जोरदार धूमचक्री झाली आणि जमाव आक्रमक होऊन पोलिसांच्या नियंत्रणा बाहेर जाऊ लागल्यामुळे उपविभागिय अधिकाऱ्यांनी गोळीबारचे आदेश दिले, व पोलिसांनी जोरदार गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला,, तोपर्यंत मध्यरात्र उलटली होती,,, आम्ही सर्व गारठुन गेलो होतो,,, त्या मध्यरात्री नार्वेकरांच्या सौभाग्यवती भारती ताईंनी आम्हा एवढ्या कार्यकर्त्यांना स्वतः च्या हाताने आम्लेट चपाती चहा बनवून कार्यालयात पाठवला,,, त्याच दिवशी सावंतवाडी मधील प्रसिद्ध माठेवाड्या ची जत्रा होती,,, पण ह्या गोळीबाराच्या घटनेमुळे सर्व शहर सुन्न झाले होते,,,,,,, त्या भयानक प्रसंगी आम्ही सर्वजण दिलीप नार्वेकरांच्या कुशल व मुत्सद्दी नेतृत्वा मुळे वाचलो ( त्या भयाण रात्री नार्वेकरांनी जे डावपेच वापरले आणि वकिली कसब पणाला लावले ते इथे नमुद करु शकत नाही ),,,,!!! लोकसभा निवडणूक संपुन प्रा दंडवते भारताचे अर्थमंत्री बनले,, पण आमच्यामध्ये व जनता दल कार्यकर्त्यांमध्ये कटुता निर्माण झाली,त्यांच्या तक्रारी नुसार,,कायद्या प्रमाणे पोलीस निरीक्षक विलास भोसले ना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले,,, तत्कालीन कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक ओ, पी, बाली साहेब यांचे उपस्थितीत सदर गोळीबाराची चौकशी सुरु झाली, त्यावेळी सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक विनोद लोखंडे साहेब हे होते,,ह्या गोळीबार प्रकरणाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष्य होते,,,,!!आम्हा सर्वांचे जाब जबाब दोन दिवस सलग सुरु होते, तेव्हा दिलीपजी नार्वेकरांनी आम्हाला मानसिक बळ देऊन,, आमच्यावर कोणतीही कारवाई न होता व आमच्या जबाबा मुळे पोलीस निरीक्षक विलास भोसले पण दोषमुक्त होऊन पुन्हा नोकरीत रुजू झाले,,,, त्या घटनेतील दिलीप नार्वेकरांचे वकिली कौशल्य अख्या महाराष्ट्राने पाहिले,,,त्या प्रसंगी नार्वेकर नसते तर एवढ्या मोठ्या जमावासमोर आणि त्या क्षणी च्या स्फोटक परिस्थिती मध्ये काँग्रेस कार्यालयातला एकही कार्यकर्ता जिवंत राहिला नसता,,,,,,,,,
वरील घटनेचा एवढा उहापोह करण्याचे कारण एवढेच आहे!!! की,,,,,,,आताच्या बॅनरबाज “पोस्टर बॉय ” पुढऱ्यांना समाजासाठी व पक्षासाठी त्यावेळच्या नेत्यांचे योगदान व बांधिलकी समजणार नाही !!! जुलै 1987 साली तत्कालीन कोकण चे नेते कै भाई सावंत आकस्मिक निधनझाल्याने अंत्यविधी साठी सरकार चे प्रतिनिधी म्हणुन तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मंत्री पदमसिंह पाटील उपस्थिती होते,,,, अंत्यविधी आटोपल्यावर कै भाई सावंताच्या रिकाम्या झालेल्या विधानपरिषद जागे साठी दोन्ही मंत्र्यांनी दिलीप नार्वेकरांना मुंबईत येऊन मा शरद पवार साहेबाना भेटण्याची सूचना केली होती, ह्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत ( तेव्हा भाई सावंता यांचे सुपुत्र विकास सावंत याचे वय भरत नसल्यामुळे ) पण दिलीप नार्वेकरांनी नगरपालिका हेच आपले कार्यक्षेत्र मानून मुंबईला जाण्याचे टाळले,,,,,, अन्यथा ह्या मतदार संघा चे राजकीय चित्रच तेव्हा बदलले असते,,,,!!असा हा बिनधास्त,, मोकळ्या ढोकळ्या स्वभावाचा,,प्रसंगी काळीज काढून देणारा,,ओठात तेच पोटात,, आपले शौक सुद्धा जाहीर व्यासपीठावर मांडणारा,, दिलदार वृत्ती चा,, कधीच धूर्तपणे न वागणारा,, जे असेल ते बेधडक व्यक्त करणारा,,नेहमीच मिश्किल व दिलखुलास असणारा नेता शोधूनही सापडणार नाही,,,,!! तत्वनिष्ठा काय असते हे नार्वेकरांकडून शिकावे,,कोकणचे भाग्यविधाते असलेल्या मा, नारायणराव राणे साहेबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असतांना सुद्धा नार्वेकर तत्वाशी तडजोड न करता मा, राणे साहेबांसोबत गेले नाहीत,,ते जर प्रवाहा सोबत गेले असते तर त्यांना मोठा राजकीय लाभ पण मिळाला असता,,,!!तरी पण ह्या वयात काँग्रेस पक्षाचे सक्रिय काम करत आहेत,,खरे म्हणजे निष्ठावंत म्हणुन काँग्रेस ने त्यांचा सत्कार केला पाहिजे,,,,,,,, त्यांच्या निष्ठेला सलाम!!!
Adv दिलीप नार्वेकरांवर लिहायला गेलो तर कागद अपुरे पडतील असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे,,,,,,,
आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी परमेश्वरा ने त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य देऊन त्याच्या सर्व मनोकामना पुर्ण कराव्यात हिच परमेश्वर चरणी पार्थना 🙏
Advocate दिलीपजी ना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐💐💐💐
शुभेच्छुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय,,
सावंतवाडी
सिंधुदुर्ग
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा