You are currently viewing वेडसर…. निशिगंध…!!
Oplus_16908288

वेडसर…. निशिगंध…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वेडसर…. निशिगंध…!!*

 

नक्षत्रांच्या नाच-या वरातीत

रंगलेत …मनस्वी चराचर

वेडसर निशिगंध लगडला

एकांताच्या ..निशब्द काठावर..!

 

चांदण्यांच्या बेभान चाहुलीने

रातराणी …घालते दंगा

मौनरागी धुसर पुष्पसंभारातून

वारिया …घालतो पिंगा…!

 

काजवे..तिमिराच्या घुमटांत

स्वतःचीच वाट चुकतात

डोहाला ..जाग येताच

चांदण्याला मीठी मारतात..!

 

नाजूक सुमनांची ..सळसळ

उतरली पिंजारलेल्या रोमारोमांत

निशिगंधाला मीठी मारण्यास

पसरले …चांदण्यांचे हात…!

 

माझ्यातला वेडसर निशिगंध

जागवतो माझ्यातला दरवेश

पानोपानी निःशब्द काठावर

फुलवतो ..अक्षरांची वेस ….!

 

बाबा ठाकूर ठाकूरीउवाच

निसर्ग हाच ईश्वर..बावीसावी रचना

सादरीकरणाची..अक्षरवेस..

प्रतिक्रिया व्यक्त करा