*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्याकडेच येत आहे.. धुंदीत मी*
सुर्यकातांच्या लाल पात्रात
कल्पवृक्षाची पाने घोळतो
उद्य्दीपीत करणारं मद्य घेवून
तुझ्याकडेच येतो…
वृक्षांच्या पानातून झिरपणारे
चंद्रप्रकाशाचें हे.. कवडसे घेतो
चांदण्याची फुलें हातांनी वेचून
तुझ्याकडेच येतो …
अंगुलीने केशसंभार.. माळणा-या
तिमीराला किरणांसह उचलून घेतो
केतकीच्या शुभ्र परागांच्या सोबतीनं
तुझ्याकडेच येतो …
निशेने आग्रहच धरला
हे ..चंद्रबिंब तिला देतो
पुर्वेला हेच.. गुपित सांगून
तुझ्याकडेच येतो…
नजर घरगंळत..आहे
शब्द बरळत… आहे
धर्मबिंदू तरळत ..आहे
निसर्ग..लाडावला..आहे
तुझ्याकडे येत आहे ..नशेत मी
तुझ्याकडेच येत आहे..धुंद मी
बाबा ठाकूर
