*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”मती प्रकाशु गणेश”*
बुद्धिदाता गणेशास साष्टांग नमन
सकळ मती प्रकाश करी प्रदानIIधृII
गणपती आहे केंद्र बिंदू स्थानांत
सर्व दिशांना उजळत तेजो किरण
सर्व साहित्याला टाकीतो उजळूनII1II
व्यास लिहून घेतले वेदोपनिषद पुराण
साहित्य वाड्.मय करी सुसंस्कृत संपन्न
नागर साहित्य केले समृद्ध गणेशानंII2II
अज्ञानाचा अंधार नाश करता भास्कर
कलियुगी विघ्नहर्ता सर्वांस वाटे आधार
सर्व कार्यात गणपतीचा राहे अग्रमानII3II
पाशांकुश धारी सर्पास कटी बांधून
गजमुखीस सृष्टी आधीन मूषक वाहन
राखू पर्यावरण वाहू दुर्वांकुर सुमनII4II
©️काव्य:श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
