You are currently viewing पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात कार्यरत रहा- प्रमुख वक्ते नवलराज काळे यांचे प्रतिपादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात कार्यरत रहा- प्रमुख वक्ते नवलराज काळे यांचे प्रतिपादन

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात कार्यरत रहा- प्रमुख वक्ते नवलराज काळे यांचे प्रतिपादन*

*धनगर समाज विचार मंच सिंधुदुर्ग आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती उत्साहात साजरी*

ओरस सिंधुदुर्ग

– धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरस सिंधुदुर्ग येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे नवलराज काळे हे प्रमुख वक्ते लाभले होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील संघर्षमय माहिती श्रोत्यांना अगदी विस्तृतपणे सर्व माहिती काळे यांनी दिली. अहिल्या मातेचे बालपण विवाह, अनिष्ट प्रथा निर्मूलन, पती खंडेराव सासरे मल्हारराव व मुलगा मालेराव यांच्या मृत्यूनंतर करावा लागलेला संघर्ष, राघोबा पेशवा वरती महिलांचा सैन्य घेऊन लढाईची तयारी दर्शवली व पत्रव्यवहार करून लढाई जिंकली त्याची विस्तृत माहिती व प्रजेला दिलेला न्याय शेतकऱ्यांना दिलेली सवलत सातबारा संकल्पना, दरोडेखोर यांना प्रवाहात आणून रोजगार निर्मिती व प्रजेचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली, देव देवळांचे जिर्णोद्धार, विहिरी घाट तलावे पानपोह्या, यांसारख्या अनेक गोष्टी देश उभारणीसाठी अहिल्याबाई होळकर यांनी केल्या, ज्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आता फायद्याच्या ठरत आहेत.महेश्वरी साडी उद्योग उभा करून आपल्या जनतेतील विधवा आपला महिलांसाठी रोजगार निर्मितीचे काम मातेने केलं, मातेच्या राज्यात नाही निवडा कसा होतो याची विस्तृत माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली. जनतेला दिलेला आधार व दिलेली सेवा तब्बल तीन दशक एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र घेऊन सैतानांशी लढा देत पारदर्शक केलेला राज्यकारभार याबाबतची विस्तृत माहिती श्री काळे यांनी आपल्या व्याख्यानात दिली यावेळी बोलत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे 18 व्या शतकात केलेलं कार्य आपल्यातील प्रत्येकाच्या हातातून 21 व्या शतकात घडावं व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने समाजकार्यात कार्यरत राहावं असं प्रतिपादन युवा व्याख्याते श्री नवलराज काळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सेवानिवृत्त नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांनी केली, तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बापू खरात यांनी देखील अहिल्याबाई होळकरांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती उपस्थितांना दिले, सत्कारमूर्ती सौरक यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ जानकर यांनी देखील विचार मंच व्यासपीठावरून संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देऊ जंगले यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सचिव डोईफोडे सर यांनी धनगरी भाषेत सर्वांचे आभार मानले.
यावेळी विचार मंचचे अध्यक्ष एकनाथ जानकर, माजी पोलिस उपनिरीक्षक बापु खरात, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नवलराज काळे, भवन समिती अध्यक्ष कानु शेळके, माजी गटविकास अधिकारी आर डी जंगले, माजी नायबतहसीलदार गंगाराम कोकरे, विठ्ठल खरात पांडूरंग काळे, देऊ जंगले, लक्ष्मण शेळके, संतोष साळसकर, रामचंद्र डोईफोडे, संतोष बोडके, धिरज हुंबे, संतोष गुरखे, आदी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते.

यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून प्रतेक तालुक्यातील एका कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्या महिलांनी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम केले आहे अशा सर्व महिलांचा या ठिकाणी शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशिक्षक पत्र देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये विशाखा नवलराज काळे, सुवर्णा झोरे, दिपा ताटे, दर्शना जंगले, स्वप्नाली शेळके, माजी सरपंच वरक आदींचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा