You are currently viewing ग्राहक चळवळीला चालना मिळेल….

ग्राहक चळवळीला चालना मिळेल….

– श्री.ए.के. नाईक.

वैभववाडी

ग्राहक चळवळीला चालना आणि ग्राहकांना नवा दृष्टिकोन देण्याचे कार्य ग्राहक चळवळीचे मुखपत्र असलेले “ग्राहक दृष्टिकोन” या मासिकाव्दारे होत आहे असे प्रतिपादन वैभववाडी तहसिलचे निवासी नायब तहसिलदार श्री.ए.के.नाईक यांनी केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ- सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दृष्टीकोन मासिकाचा फेब्रुवारी २०२१ या अंकाचा प्रकाशन सोहळा वैभववाडीचे निवासी नायब तहसीलदार श्री.ए.के.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात संपन्न झाला.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य केले जाते. या प्रकाशन कार्यक्रमाला वैभववाडीचे वाहतूक नियंत्रक श्री. संजयकुमार भोवड’ ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. एस. एन.पाटील, सचिव श्री. संदेश तुळसणकर , महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंखे, ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष श्री. शंकर स्वामी, वैभववाडी व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. मनोज सावंत,अॕड. प्रताप सुतार, सदस्य नंदकिशोर प्रभू व श्री. शांताराम कोलते आदी मान्यंवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =