You are currently viewing शब्दांचं माझ्या….अर्थकारण..!!

शब्दांचं माझ्या….अर्थकारण..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दांचं माझ्या….अर्थकारण..!!*

 

शब्दांचा माझ्या..स्वतःचा तोरा

स्वतःची शक्तधुंद चाल

वृत्ती …अहंकार गाजवण्याची

घेतले करून..स्वतःचे हाल..

 

ओठ उघडताच..ते

माझ्याकरता महाग होतात

प्रसवशील उजेडात पोचताचं

वसुली माझ्याकडून करतात ..

 

विश्वाचं आर्त..सर्वार्थानं..माझचं

अस माझ्यातल्या कवीला वाटायचं

पैसे..पदरचे ..मोडत..मोडत

व्यक्तीत्व …जपायला झगडायचं

 

अर्थकारणाची …स्वतंत्र चूल

शेवटी..शब्दांनी आमच्या मांडली

प्रादेशिक गड खालसा होताचं

धग..आमच्या चूलीची विझली..

 

हल्ली..नात जपण्याचं काम

शब्दांनीच..अंगावर घेतलं

आर्थिक मोबदला न घेता

रहस्य शब्दांनीचं…उलगडलं..

 

उद्गाराचा..बंध घेऊन

शब्द आता..अडखळत नाही

अनुभवाचा आवाज.. नेमका

चव्हाटय़ावर …मांडत नाही..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा