*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा. सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चांदोमामा आले घरात*
*******************
*शेवटी संपला लपंडाव*
*आकाशीच्या चांदोमामाचा*
*पृथ्वीधामवर आणण्यात*
*विजय झाला इस्रोच्या कामाचा।।१।।*
*पर्याय काही उरला नाही*
*म्हणून चांदोबा बसले यानात*
*बघता बघता खेळायला आले*
*साऱ्या भारतीयांच्या घरात।।२।।*
*चांदोमामाच्या कुशीत दडलंय काय?*
*आता पाहू आलटून पालटून*
*चांदोमामाचे अलौकिक रूप*
*ठेवू साऱ्या मनामनात ठासून।।३।।*
*******************************
*रचनाकार:-* सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
🌸🌺🪷🌸🌺🪷🌸🌺🪷🌸🌺