You are currently viewing बेत आमचे भारी

बेत आमचे भारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम बालकविता*

 

*बेत आमचे भारी*

*******

सुट्टीच्या दिवसातले बेत भारी

रोज खेळू एका मित्राच्या घरी

 

उन्हात नको कुठे बाहेर पडणे

घरात बसून बैठे खेळ खेळणे

 

आज्जी जागी असते दिवसभर

बारीक लक्ष असे तिचे पोरांवर

 

एखादे दिवशी आई घरी असते

ती पण पोरांच्या खेळात रमते

 

मग काय पोरांची चंगळच असते

खेळता खेळताच खायला मिळते

 

आबांनी शिकवलेत पत्त्यांचे खेळ

खूपच मज्जेत जातो पोरांचा वेळ

 

वेळ नाही, बाबा नेहमीच म्हणतात

फ्री असले की,मग येऊन खेळतात

 

व्यापार, लाल पान सात , खेळतो

सुट्टीचे दिवस असे छान घालवतो

**********

कवी-अरुण वि.देशपांडे -पुणे

9850177342

********************************

प्रतिक्रिया व्यक्त करा