You are currently viewing शब्दांचे सामर्थ्य व सौंदर्य गदिमांच्या पूर्वतपश्चेचे फलित सुकन्या जोशी यांचे प्रतिपादन

शब्दांचे सामर्थ्य व सौंदर्य गदिमांच्या पूर्वतपश्चेचे फलित सुकन्या जोशी यांचे प्रतिपादन

*साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे पणजीत काव्यांजली*

 

पणजी (प्रतिनिधी):

गदिमांना त्यांच्या आईकडून कवितेचे बाळकडू मिळाले. आईवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांची शब्दसपंत्ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दांत सौंदर्य होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती. त्यांच्याकडून गीतरामाय़ण व इतर काव्याचे एकटाकी लेखन झाले. अभंग ते लावणी, कविता व चित्रपटगीते त्यांनी समरसतेने लिहिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका सुकन्या सुजीत जोशी यांनी केले.

आपले लिखाण सरस आणि सकस असले तर आपल्याला लोक बोलावतीस, शंकर रामाणी यांची समग्र कविता हे पुस्तक लिहण्यासाठी दोन वर्षे त्यांच्या कवितेचा अभ्यास केला पूर्वसूरींचे साहित्य वाचले पाहिजे, असो डॉ. अनुजा जोशी म्हणाल्या.

साहित्यिकांनी वाचन केले पाहिजे व आपण वाचलेले स्वतः वाचले पाहिजे, असे मत न्या. अंबादास जोशी यांनी केले. प्रशांत गौतम यांनी बृहन्महाराष्ट्र व्हॉटस अप समूहाचा इतिहास सांगितला. या माध्यमातून आलेले अनुभव त्यांनी कथन केले.

साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव व बृहन्महाराष्ट्र मित्र व्हॉटस अप समूह संभाजीनगरचा तिसरा वर्धापन दिन आणि काव्यांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात घेण्यात आला.

बृहन्महाराष्ट्र व्हाटस समूहाचे मुख्य प्रशासक प्रशांत गौतम, नारायण पांडवे व अरविंद बर्वेव सुजीत जोशी हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

यावेळी झालेल्या काव्यांजली या कविसंमेलनात सुकन्या जोशी, डॉ. अनुजा जोशी, आसावरी भिडे, आलिशा गडेकर, प्राची नाईक, तृप्ती बांदेकर, बबिता गावस, सरिता सामंत, नूतन दाभोळकर, डॉ. रेखा पौडवाल, लक्ष्मी महात्मे, लक्ष्मण पित्रे, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, नारायण पांडव, गौरी भालचंद्र, प्रमोद कारापूरकर, चित्रा क्षीरसागर, रजनी रायकर, कविता आमोणकर, शर्मिला प्रभू आदिंनी कविसंमेलनात सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − one =