You are currently viewing मच्छिमारांचे उत्पन्न दुप्पट करणारी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना…

मच्छिमारांचे उत्पन्न दुप्पट करणारी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना…

सिंधुदुर्गनगरी 

मत्स्योत्पादनात वाढ, कृषि मुल्यवर्धन, निर्यातमुल्य वाढ करणे, सरासरी उत्पादकता वाढविणे, मासेमारी नंतर होणारे नुकसान कमी करणे व राष्ट्रीय दरडोई मत्स्य आहाराचे प्रमाण वाढविणे यासह मच्छिमार व मत्स्यकास्तकार यांचे उत्पन्न दुप्पट करणे व रोजगार निर्मिती करणे या  उद्देशाने केंद्रप सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे.

       केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेमध्ये लाभार्थी भिमुख योजना व लाभार्थी हिस्सा नसलेल्या योजना अशा प्रकारे योजनांचे विभाजन करण्यात आले आहे. लाभार्थी भिमूख योजनेमध्ये सर्वसाधारण 40 टक्के अनुदान आहे. त्यामध्ये केंद्राचा हिस्सा 24 टक्के व राज्याचा हिस्सा 16 टक्के आहे. तर लाभार्थीचा हिस्सा हा 60 टक्के असेल. अनुसूचित जाती, जमाती व महिलांसाठी 60 टक्के अनुदान असेल. त्यामध्ये केंद्राचा हिस्सा 36 टक्के व 24 टक्के राज्याचा हिस्सा आहे. लाभार्थीचा हिस्सा 40 टक्के असणार आहे.

       यामध्ये पुढील उपक्रमांचा समावेश आहे. भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय विकास, सागरी मत्स्यव्यवसाय विकास मैरी कल्चर व समुद्र शेवाळ लागवडीसह, शोभिवंत माशांचे संगोपन व पर्यटनात्मक मत्स्यव्यवसाय, अधुनिक तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसायाकरीता पायाभूत सुविधा आणि काढणी पश्चात व्यवस्थापन, शित साखळी व्यवस्थापन, मासळी बाजार व पायाभूत सुविधा, खोल समुद्रातील मासेमारीचा विकास, जलीय आरोग्य व्यवस्थापन, मच्छीमारांची सुरक्षा व सुरक्षितता मजबूत करणे, मत्स्यव्यवसाय विस्तार व सहाय्य सेवा यांचा समावेश आहे.

       अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग मालवण, दूरध्वनी क्रमांक 02365-2252007, व्हॉट्स ॲप क्रमांक – 8999641893, ई-मेल – pmssy.sindhudurg@gmail.comacfsdurg@gmail.com येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ना.वि.भादुले, सहाय्यक आयुक्त मस्त्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =