You are currently viewing जिल्हास्तरीय रक्षा कृतज्ञता बंध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

जिल्हास्तरीय रक्षा कृतज्ञता बंध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

बांदा

डाॅ.अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने दरवषी प्रमाणे साजरा होणारा रक्षाबंधन सण यंदा अनोख्या पध्दतीने रक्षा कृतज्ञता बंध या उपक्रमाने यशस्वीपणे राबविला.
या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ते२४वर्षे वयोगटातील बालयुवा पिढीने
स्व कौशल्यातून राखी बनवून सदरील राखी आपल्याच परिसरातील सामाजिक संस्थेचे कर्मचारी तसेच समाजासाच्या विविधांगांनी मदतीला धावून मदत करत असलेल्या सर्वसमान्य नागरीकांना ही राखी बांधून हा दिवस साजरा केला गेला. जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रम तळेरे येथील तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरेच्या श्रावणी मदभावे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या उपक्रमात वैभववाडी तालुक्यातील नाधवडे हायस्कूल नाधवडे, कणकवली तालुक्यातून तिवरे मराठी शाळा, डांबरे मराठी शाळा,विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय तळेरे ,वामनराव महाडिक विद्यालय तळेरे ,ज्ञानप्रबोधिनी विद्यालय करुळ तसेच
*बांदा नं .१ केंद्रशाळेचा वैशिष्टपूर्ण सहभाग लाभला*
तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रत्येक उपक्रमात उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं. १ केंद्रशाळेचा नेहमीच हिरीरिने सहभाग असतो. या शाळेत तंबाखूविरोधी जनजागृती करणेसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून जनजागृती करण्यात येत असते.रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानानांही पोस्टाने राख्या पाठवल्या आहेत.तसेच विद्यार्थ्यांना समाजात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नागरिकांना राखी बांधण्यात आली . कोरोना कालावधीत कोरोना योध्दा म्हणून उत्कृष्ट कार्य केलेल्या बांदा आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक राजन गवस सेवा निवृत्त शिक्षक वासुदेव कळंगुटकरआदी व्यक्तींना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमासाठी तिवरे मराठी शाळेचे कदम सर ,नाधवडे हायस्कूलचे डी. एस .पाटील सर
तळेरे हायस्कूलचे श्री कानेकर सर, मांजरेकर सर दळवी महाविद्यालयाचे श्री महाडिक सर, शेट्ये सर बांदा केंद्रशाळेचे जे.डी.पाटील तसेच विविध मान्यवर व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा