You are currently viewing साहिल चव्हाण दहावी परिक्षेत 80.80 टक्के गुण प्राप्त

साहिल चव्हाण दहावी परिक्षेत 80.80 टक्के गुण प्राप्त

कणकवली :

आयडीयल इंग्लिश स्कूल विद्यानगर, वरवडे, कणकवली, जि. सिंधुदुर्ग या प्रशालेतील कु. साहिल रेवती रविंद्रकुमार चव्हाण याने एस.एस.सी (10 वी) (इंग्रजी माध्यम) बोर्ड परिक्षेत 80.80 टक्के गुण प्राप्त करीत यश संपादन केले आहे.

कुठल्याही खासगी क्लासेसला न जाता साहिल याने हे यश मिळविले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, या यशाचे मागे त्याच्या प्रशालेतील सर्व शिक्षक, आई, वडील, बहिण, आजोबा, आजी, काका, दोन मामा व आप्तेष्ट याचा मोलाचा वाटा होता. शिवाय कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले आहे.

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथील स. अधीक्षक रविंद्रकुमार चव्हाण याचे ते चिरंजीव होय.

प्रतिक्रिया व्यक्त करा