You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची घोषणा..

 

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती होणार असल्याची घोषणा सावंतवाडीत युतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केली. युतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच एकत्र येत निर्णय घ्यावा असं मत होतं. त्यानुसार सर्व नेते मंडळी एकत्रीत आलो आहोत. आजपासून ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे दोन पक्ष जिल्ह्यात एकत्र येत युतीच्या माध्यमातून लढणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन, सल्ला मसलत करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय बैठक घेतल्या जाणार असून युती व्हावी या संदर्भातील सुचना स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची इच्छा होती. मात्र, पक्ष नेत्यांनी आदेश दिले त्यानुसार जास्तीत जास्त ठिकाणी युतीच्या माध्यमातून लढणार, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील वाटचाल होणार असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले. दोन पक्ष एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हा संदेश पुन्हा एकदा राज्यात पोहचवायचा आहे. त्यासाठी नेत्यांनी राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे. यात खालचे कार्यकर्ते दूखवणार नाही याचीही काळजी आम्ही घेणार आहोत. स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांची समजूत घालत सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाऊ. एकटे लढलो असतो तरी जिंकलो असतो, आज खरेदी-विक्री संघानंतर पुन्हा एकत्र आलो आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीला पुन्हा धूळ चारू असा विश्वास व्यक्त करत आमच्यावर कुणाचाही दबाव नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढे जात आहोत अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + eleven =