You are currently viewing माय माय माय..
Oplus_16908288

माय माय माय..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माय माय माय..*

 

माय माय माय दुधावर साय

वंदू तुझे पाय रोज माते..

 

जगाचा नियंता तुझ्या रूपे नांदे

जगण्याचे वांधे तुजविण…

 

ज्यास नाही माय त्यास विचारावे

तूच सावरावे जगतास..

 

कंदिलाची वात चंद्र तू शीतल

आणू ग कोठलं बळ सांग..

 

तूच सीता सती तूच अनसुया

अनुभव घ्याया यावे पोटी..

 

तूच ग अनंत तूच देव माझा

पंढरीचा राजा तूच माझा..

 

तुज विसंबणे घोर पाप माये

सुख नित्य पाहे तुझ्यात मी..

 

करी कृपा नित्य तुझा आहे भक्त

तूच सार सुक्त जीवनाचे..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा