You are currently viewing मास्क वापरा… दो गज की दुरी…

मास्क वापरा… दो गज की दुरी…

*आजी-माजी लोकप्रतिनिधींचा व्हिडिओ व्हायरल*

*मंगळवारी गावकऱ्यांची बैठक*

 

एकीकडे माणसे जगतात की मरतात अशी परिस्थिती कोरोनामुळे उद्भवलेली असताना *मास्क वापरा, दो गज की दुरी,* अशा एक ना अनेक सूचना सरकार नागरिकांना करत असतानाच प्रेमाचे चाळे करतानाचे अश्लील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात सरकारच्या सूचनांचे पार दिंडवडे उडवलेले दिसत आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील अगदी गेली काही वर्षे फक्त एका व्यक्तीच्या शब्दांवर संपूर्ण गाव चालायचे अशा आदर्शवत गावातील आजी आणि माजी लोकप्रतिनिधींचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. माजी लोकप्रतिनिधी हा केरळीयन पद्धतीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असलेला उद्योजक असून सधन कुटुंबातील जागरूक नागरिक आहे.  त्याच्या सोबत अश्लील व्हिडिओ मध्ये असलेली दुसरी व्यक्ती ही देखील पेशाने आजच्या घडीला कोविड रुग्णांच्या सेवेत असायला हवी होती, अशा पेशातील असून आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी असून आपली काय जबाबदारी आहे, आपली बदनामी म्हणजे गावाची बदनामी हे विसरून, नको ते कृत्य करतानाचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यामुळे त्या दोन्ही व्यक्तींची प्रतिमा तर मालिन झालीच परंतु गावातील थोर व्यक्तींनी निर्माण केलेली गावाची प्रतिमा देखील कठोर परिक्षेवर आणून ठेवली आहे. या अश्लील व्हिडीओ मध्ये दोघेही आजी माजी लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे निर्लज्जपणाचा कळस करत आहेत हे पाहिले असता गावच्या जबाबदार पदावर ते कसे काय निवडून दिले गेले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे गावाची होत असलेली बदनामी आणि पुढे काय करायचे हा प्रश्न समोर उभा राहिल्याने गावकऱ्यांनी तातडीची बैठक घेत, उद्या पुन्हा गाव बैठक घेऊन गावाचा पुढचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आ-वासून उभे असताना गावच्या जबाबदार लोकप्रतिनिधींना ही काय थेरं सुचतात असा प्रश्न गावातील समजूतदार नागरिकांना पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =