*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निकष काही ते असतात…*
स्पर्धा करावी कोणाशी हो निकष त्याचे असतात
ऐऱ्यागैऱ्याशी ती स्पर्धा जन हो सारे हसतात..
वकूब आपला पाहून घ्या, ना तर फजिती होते हो
आडात नाही पोहऱ्यात मग येईल कोठूनी सांगा हो…
कळत नाही काय आपणा आधी समजून घ्यावे हो
उगा वल्गना करूनी कशाला धोंडा पाडून घ्यावा हो..
जनास कळते कोण तो ज्ञानी कोण अर्धवट राव
असे
अज्ञान्याला कळत नाही रोज कर्दमी फसत असे..
ज्ञानवंताशी स्पर्धा करावी उत्तम शिकण्या साठी हो
पाय खेचण्या स्पर्धा नसावी अंगलट मग येते हो..
काय आपणा कळत नाही पाण्यात किती ते
आपण हो
त म्हणता लोकांना कळते लायकी ज्याची नाही
हो..
अहंकाराने फुगून बेडूक एक दिवस तो फुटणार
अंतरंग जाळते तयाला जळूनच तो मरणार..
ज्ञानार्थी ते व्हावे जन हो अफाट आहे सागर
काठावरती फिरत राहूनी भरून घ्यावी घागर..
उतू नये हो मातू नये हो वरती बसला बाप बघे
भ्रमात राहू नका गड्यांनो लवकर व्हावे हो जागे..
आधाराने बांडगुळासम वाढू नये यात शहाणपण
असते हो
आपण आपली जागा करावी ज्ञानकण ते वेचून
हो..
मांजर म्हणते पहात नाही, डोळे मिटूनी चोऱ्या करी
भगवंताला जरा घाबरा हिशोब करतो बरोबरी..
कितीही शिकवा मुढाला त्या पडे घागरी वर पाणी
अर्ध्या हळकुंडाने पिवळा अज्ञान्याला कोण गणी..
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
