कला शाखेत खुशी पानवाला, वाणिज्यात सांजल भोवड तर विज्ञानात चैताली तळेकर प्रथम
कणकवली / तळेरे (प्रतिनिधी):
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी बारावी (एच.एस.सी.) २०२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७% लागला आहे.
यामध्ये कला शाखेचा निकाल ९१.००%, वाणिज्य शाखेचा १००% तर विज्ञान शाखेचाही १००% लागला आहे. वाणिज्य शाखेतील सांजल संदीप भोवड (४८५ गुण – ८०.८३%) हिने तिन्ही शाखांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी
कला शाखा:
खुशी प्रणव पानवाला – ३६६ गुण (६१%)
समिआ तारिक हुना – ३६० गुण (६०%)
वेदांत रघुनाथ तानवडे – ३३४ गुण (५५.६७%)
वाणिज्य शाखा:
सांजल संदीप भोवड – ४८५ गुण (८०.८३%)
समीक्षा संतोष पाटणकर – ४३० गुण (७१.६७%)
तनिष्का संदीप बांदिवडेकर – ३९८ गुण (६६.३३%)
विज्ञान शाखा:
चैताली प्रशांत तळेकर – ३७७ गुण (६२.८३%)
श्रावणी संदीप तळेकर – ३६९ गुण (६१.५०%)
निशांत विजय घाडी – ३६८ गुण (६१.३३%)
या यशस्वी विद्यार्थ्यांचे तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिटणीस श्रीकृष्ण तुकाराम खटावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, सर्व समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
