You are currently viewing मुख्य रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हटवले

मुख्य रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हटवले

मुख्य रस्त्यावर पडलेले झाड सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हटवले

पोलीस स्टेशनजवळ वाहतूक सुरळीत; पोलीस अनिल धुरी यांचे सहकार्य, वाहनचालकांकडून कार्यकर्त्यांचे कौतुक

सावंतवाडी

आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशनजवळील मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठे झाड तुटून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
याचवेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्या मार्गाने जात असताना त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडीतून उतरून झाडाच्या फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले. पोलीस कर्मचारी अनिल धुरी यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी झाडाच्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
या वेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, आशिष बांदिवडेकर आणि संदेश नाईक यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या तत्परतेमुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्याबद्दल वाहनचालकांनी आणि नागरिकांनी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा