You are currently viewing दोडामार्गात वैभव नाईक यांचे जल्लोषी स्वागत; कार्यकर्त्यांना दिला ठाम पाठिंब्याचा शब्द

दोडामार्गात वैभव नाईक यांचे जल्लोषी स्वागत; कार्यकर्त्यांना दिला ठाम पाठिंब्याचा शब्द

“शिवसैनिकांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी माझी” – जिल्हाप्रमुख वैभव नाईक

दोडामार्ग :

वैभव नाईक यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर दोडामार्ग बाजारपेठेत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.

यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे. सत्ता येईल-जाईल, मात्र आपण विचारांशी ठाम राहणार आहोत. “मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता असून पदाधिकारी व शिवसैनिकांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी माझी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दोडामार्ग तालुक्यात हत्तींकडून होणारे नुकसान, अवैध खाणकाम तसेच रस्ते, पाणी, वीज व आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर शिवसेना संपर्क कार्यालयात निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

यावेळी बाळा गावडे यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात संघटनेला बळकटी मिळाल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला असून ते त्याला न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरसेवक चंदन गावकर यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असे सांगितले. तालुकाप्रमुख संजय गवस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग तालुक्यात शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. बाबुराव धुरी यांनीही जिल्हाप्रमुख म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख करत पुढील काळात संघटना अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, दोडामार्ग उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हासंघटक विनय जाधव, उपतालुकाप्रमुख संदेश राणे, मिलिंद नाईक, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, महिला तालुकाप्रमुख जेनिफर लोबो, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, अतुल कर्पे, संतोष मोर्ये, भिवा गवस, गणेश धुरी, प्रदीप सावंत, राजू गावडे, संजय सुतार, देवानंद गवस, श्याम खडपकर, शुभम देसाई, प्रकाश कदम, अनंत शेटकर, दिलीप शेर्लेकर, आत्माराम मेस्त्री, प्रमोद टुंबरे, अंकुश आजरेकर, दशरथ मोरजकर, सोमनाथ गवस, दीपक पेडणेकर, सत्यवान नाईक, रामा कासकर, सोमा खोत, रेश्मा शेख, रघुवीर देऊलकर, तानाजी देसाई, सिद्धेश कासार, सूर्यकांत डांगी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा