*संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांचा अनाम प्रेम संस्थेकडून सन्मान*
सिंधुदुर्ग
दिनांक 19/4/2026 रोजी कुंभार माठ जानकी मंगल कार्यालय येथे अनाम प्रेम संस्थेच्या माध्यमातून अंधबांधवांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये भारत देशातून विद्यार्थी पालक व अनाम प्रेमचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अनिल शामू शिंगाडे व साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी अंधत्वावर मात करून संस्थापक व समाजसेवेचा मान पटकावल्यामुळे अनाम प्रेम संस्थेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा प्रेरणा मॅडम प्रशांत भाट संदीप खानोलकर व आदींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला त्यावेळी अनिल शिंगाडे यांनी सांगितले की हा सन्मान सोहळा माझा नसून माझ्या कार्याचा व माझ्या दिव्यांग बांधवांचा आहे आणि भविष्यातही समाज हितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला त्याबद्दल अनाम प्रेम च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व संस्थेचे आभार व्यक्त केले.
