सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा…..

सिंधुदुर्गनगरी  :

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर ही दिनांक 30 सप्टेंबर 2020 व 1 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 8 वा. सिंधुदुर्ग पोलीस विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व राखीव.
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 वा. सिंधुदुर्ग पोलीस विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथे स्थानिक लोकप्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत चर्चा, सकाळी 11 वा. सिंधुदुर्ग पोलीस विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथून शासकीय वाहनाने जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 11.10 वा. जिल्हा रुग्णाल, सिंधुदुर्ग येथे आगमन, कोविड 19 सेंटर सिंधुदुर्गला प्रत्यक्ष भेट, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्ह्यातील कोविड 19 संबंधी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक, दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून शासकीय वाहनाने सिंधुदुर्ग पोलीस विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण व विश्रांती. दुपारी 2.30 वा. सिंधुदुर्ग पोलीस विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − 3 =