You are currently viewing वैभववाडी न.पं. च्या नूतन सभापतींनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

वैभववाडी न.पं. च्या नूतन सभापतींनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

वैभववाडी

वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या नुतन सभापती यांनी आमदार नितेश राणे यांची कणकवली येथे भेट घेतली. आमदार नितेश राणे यांनी सर्व सभापतींचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली. बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपाच्या यामिनी वळवी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समिती सभापतीपदी विवेक सज्जन रावराणे, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी भाजपाचे राजन तांबे, तर महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी संगीता चव्हाण यांची निवड झाली आहे. या सर्व नूतन सभापतींचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले.यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईंणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका सुंदरी निकम, माजी सरपंच एस. एम. बोबडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा