सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
आप्पासाहेबबिरनाळे बी.एड. एम. एड.कॉलेज मध्ये शैक्षणिक चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे या पदावरून सर्व नवसंशोधकांना शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक, संशोधक प्राध्यापक, विदयार्थी यांना उद्देशून डॉ अजय साळी बोलत होते. सुरुवातीला दिपप्रज्वलनाने सर्व मान्यवरांच्या हस्ते एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन करण्यात आले. मान्यवरामध्ये प्रमुख पाहुणे डॉ.ए.एन.जाधव, डॉ.अजय साळी, डॉ. सी.पी.सोनकांबळे,डॉ. के.बी.पाटील, संस्था चेअरमन श्री. समीर बिरनाळे, प्रभारी प्राचार्या डॉ. डी.एस.बिरनाळे उपस्थित होते.
प्रथमतः उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमांची रूपरेषा डॉ. दिपा बिरनाळे यांनी स्पष्ट केली. चर्चासत्राचा एकूणच उद्देश स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनंतर प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची ओळख सहा.प्रा. व चर्चासत्र सहयोगी समन्वयक सहा.प्रा.चांदणे एस.व्ही.यांनी मोजक्या पण समर्पक शब्दात करून दिली. त्याबरोबर सहा.प्रा.होनमाने पी.पी. यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी तसेच प्रथम सत्रातील संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनतर प्रमुख पाहुणे डॉ.अजय साळी यांनी या विषयावर चर्चासत्र नियोजन केल्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक अभिनंदन केले व या विषयाची आज गरज का आहे याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनतर अध्यक्षीय भाषणात माननीय चेअरमन श्री समीर बिरनाळे यांनी महाविद्यालय सात्यत्याने प्रगतीप्रथावर जाण्यासाठी असणारे प्रयत्न तसेच स्टाफ ने केलेले मार्गदर्शन याबद्दल कौतुक केले. त्यांनतर एम.एड. मध्ये शिवाजी विद्यापीठात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या उदघाटन कार्यक्रमाचे आभार या चर्चासत्राचे संचालक सहा. प्रा. पाटोळे व्ही एन यांनी केले. त्यांनतर याच सत्रात पुढील कार्यक्रमात डॉ. सी. पी. सोनकांबळे व डॉ. के.बी. पाटील यांचे व्याख्यान झाले
डॉसीपीसोनकांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,शाश्वत भविष्याचे शिक्षण म्हणजे सहकार्य, पर्यावरणीय भान आणि चिकित्सक विचारांच्या जोडीने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे. हे शिक्षण तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा मेळ घालत भावी पिढीला पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरित करते.
डॉ के बी पाटील यावेळी म्हणाले की,AI जगभरातील डेटा गोळा करून आपल्याला सेकंदात उत्तर देऊ शकतो. पण ते उत्तर आपल्या परिस्थितीसाठी योग्य आहे की नाही, हे ठरवण्याची ‘विवेकबुद्धी’ फक्त मानवी मेंदूकडेच आहे.AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आपल्याला फक्त एक दिशा दाखवू शकतो, पण विचार करणे, निर्णय घेणे आणि विवेक वापरणे हे शेवटी आपल्या मेंदूचेच काम आहे.
चर्चासत्राचे समन्वयक सहा. प्रा.डॉ.सविता माळी यांनी त्यांची ओळख करून दिली. व या उदघाटन कार्यक्रम व व्याख्यान कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा.प्रा. कीर्तिकर वाय.एस.यांनी केले.
दुसऱ्या सत्रात संशोधन पेपर सादरीकरण विविध वर्गात करण्यात आले. यामध्ये दोन ठिकाणी नियोजन करण्यात आले होते यावेळी संशोधक, विद्यार्थी यांचा प्रतिसाद चांगला मिळाला.जवळपास 44 पेपर सादरीकरण करण्यात आले. दोन ठिकाणी विभाजन करण्यात आल्याने सुटसुटीत पणे स्मार्ट बोर्ड वरती सादरीकरण करता आले यावेळी बहिस्त साधन व्यक्ती म्हणून डॉ. शशिकांत अन्नदाते व डॉ. अंकुश बनसोडे यांनी तर अंतर्गत साधन व्यक्ती म्हणून सहा. प्रा. सतीश चांदणे व सहा. प्रा. योगेश्वर कीर्तिकर यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.
एकूणच सर्व चर्चासत्राचे नियोजन प्रभारी प्राचार्य यांचे मार्गदर्शनानुसार उत्कृष्ट पद्धतीने झाले. आलेल्या सर्वांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या नियोजनात टेकनिकल विभाग सहा. प्रा. माने एस जी यांनी, स्टेज नियोजन सहा. प्रा. माने आर बी यांनी तर Prize डिस्ट्रिब्युशन विभाग व नोंदणी विभाग ग्रंथपाल टी. ए. वाघ यांनी अतिशय चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. तसेच जेवण विभाग समीर मुजावर व कौतुक काटकर व इतर सर्व कामकाज अमोल सकळे, भारत खवाटे यांनी लागेल तिथे मदत करून आपले कर्तव्य बजावले. त्याचबरोबर या सर्वामध्ये बी. एड. एम.एड. सर्व ठिकाणी प्रशिक्षणार्थी नी देखील सहकार्य केले. या चर्चासत्रास संस्था चेअरमन श्री समीर बिरनाळे सर, डायरेकटर श्री सागर बिरनाळे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
