माजी विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच भेट
1998 बॅचचा पुढाकार; सात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात
ओसरगाव :
माजी विद्यार्थी संघाच्या व्हॉट्सअॅप गटावर करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सन 1998 च्या बॅचमधील काही माजी विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच भेट देण्याचा उपक्रम राबविला.
त्याअनुषंगाने २२ एप्रिल २०२६ रोजी इयत्ता दहावीच्या सर्व सात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संच संस्थेचे नूतन संचालक सन्मा. श्री. बबली राणे (ओसरगाव) व सन्मा. श्री. येंडे सर (बोर्डवे) यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले.
या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक, प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष व सदस्य, तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी वस्तुरूप देणगी देणाऱ्या 1998 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांमध्ये श्री. अभिषेक अनंत तांबे (बोर्डवे), श्री. संदेश लक्ष्मण मोडक (बोर्डवे), सौ. निकिता नंदकिशोर पवार (कळसुली) आणि सौ. अमृता अरविंद दळवी (पोईप) यांचा समावेश होता.
