You are currently viewing विलवडे हायस्कूलमध्ये वाहन लोकार्पण सोहळा

विलवडे हायस्कूलमध्ये वाहन लोकार्पण सोहळा

बांदा :

राजा शिवाजी विद्यालयात, विलवडे हायस्कूलमध्ये येणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्याना वेळेत जाणे येणे सोयिस्कर होण्यासाठी हायस्कूलसाठी वाहन सुफुर्त करण्यात येणार आहे.अशी माहिती ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ च्यावतीने देण्यात आली आहे. विलवडे हायस्कूलमध्ये ‘वाहन लोकार्पण सोहळा’ रविवारी ३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थीत होणार आहे.

गेल्या ३५ वर्षात हायस्कूलने विलवडे पंचक्रोशीतील विलवडे वाफोली, तांबोळी, कोनशी, भालावल, असनिये, सरमळे या गावातील हजारो विद्यार्थी घडविले. कोरोना काळात या विद्यार्थ्यांना वेळेत येणे जाणे शक्य होत नव्हते. प्रवासी वाहतुकीचे कोणतेही साधन नसताना या हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची आपल्या दुचाकीने सोय केली.

त्यामुळे विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन या हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या जाणीव येणे प्रवासी सोयीसाठी वाहन खरेदी करण्याचा निर्णय करून सर्वांच्या सहकार्याने वाहन खरेदी केले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी या वाहनाचे व्यवस्थापन विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) आणि राजा शिवाजी विद्यालय विलवडे यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विल्लावडे हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहिदास दळवी, उपाध्यक्ष समीर गावडे, सचिव रुपेश परब, सहसचिव सत्यवान राणे – कोनसकर, खजिनदार सौ. जयश्री दळवी – सुपल, सहखजिनदार सौ कृष्णकला दळवी – नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =