You are currently viewing आमदार शेखर निकम यांचे कुडाळ येथे जंगी स्वागत

आमदार शेखर निकम यांचे कुडाळ येथे जंगी स्वागत

सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांचे कुडाळ येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी हे स्वागत केले आहे. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आज अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, सुरेश गवस, अबिद नाईक, व्हीक्टर डॉन्टस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, बावतीस फर्नांडिस, आशिष कदम, नंदन साटेलकर, अशोक पवार, इफ्तिकार राजगुरू, शैलेश लाड, राजू धारपवार, प्रसाद दळवी, अस्लम खतिब, आगोस्तीन फर्नांडिस, संतोष जोईल, जावेद शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा