You are currently viewing फोंडाघाटच्या दोन तरुणांची पोलीस दलात निवड; परिश्रमांचे यश

फोंडाघाटच्या दोन तरुणांची पोलीस दलात निवड; परिश्रमांचे यश

फोंडाघाटच्या दोन तरुणांची पोलीस दलात निवड; परिश्रमांचे यश

सुरज गोसावी व देवेश गोसावी यांची निवड; देवेश लाड प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

फोंडाघाट :

येथील दोन होतकरू तरुणांची पोलीस दलात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरज गोसावी (पुणे क्रिकेट टीम खेळाडू) आणि देवेश गोसावी (कुळाची वाडी) या दोघांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. यामध्ये देवेश लाड याने प्रथम क्रमांक पटकावत विशेष कामगिरी बजावली.
ही आनंदाची बातमी समजताच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दोघांचेही अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी या यशामागील मेहनतीचे कौतुक करत पुढील सेवेतही उच्च पदांवर जाण्यासाठी सातत्याने परिश्रम घेण्याचा सल्ला दिला.
सुरज गोसावी व त्यांच्या मित्रपरिवाराने फोंडाघाट येथे स्वतःची अकॅडमी सुरू करून नियमित सराव केला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे फलित असल्याचे सुरजच्या वडिलांनी सांगितले.
या तरुणांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे यश शक्य झाले असून, भविष्यातही अशाच जिद्दीने काम करत पोलीस दलात उच्च स्थान मिळवावे, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अकॅडमीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपण त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचेही अजित नाडकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा