You are currently viewing मालवण मध्ये शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण मध्ये शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुकळवाड,पोईप, मसुरे, कोळंब, तोंडवली पं. स. मतदार संघात सदस्य नोंदणी कार्यक्रम संपन्न

कोळंब येथे आ.वैभव नाईक अतुल रावराणे यांच्या हस्ते ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

मालवण तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमांना सुकळवाड येथून सुरुवात करण्यात आल्यानंतर पोईप, मसुरे, कोळंब, तोंडवली या पंचायत समिती मतदार संघात कार्यक्रम घेण्यात आले.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, मालवण तालुका निरीक्षक अतुल रावराणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कोळंब येथे नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
*आमदार वैभव नाईक म्हणाले,* सदस्य नोंदणी करताना जे नवीन लोक आहेत कुठल्याही पक्षात नाहीत त्यांना आपण शिवसेना सदस्य होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.पक्षाने दिलेली सदस्य नोंदणीची जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीरित्या पार पाडावी.जी प्रलंबित विकास कामे आहेत ती देखील येत्या काळात मार्गी लावली जातील.शिवसेनेने केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवा असे सांगत जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर द्या असे आवाहन केले.
*अतुल रावराणे म्हणाले,* सिंधुदुर्गात शिवसेनेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजची जिल्हावासीयांची स्वप्नपूर्ती होत आहे.त्याचप्रमाणे जिल्हावासीयांचे हित जोपासत शासकीय कोविड लॅब देखिल सुरू करण्यात आली.येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी हा महत्वाचा विषय आहे. जे सदस्य नोंदणी कराल ते बाळासाहेबांच्या विचार सरणीवर चालणारे हवे.शिवसेनेशी एकनिष्ठ असणाऱ्यांना आपले सदस्य करून घ्या.जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत शिवसेनेकडे येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.त्यासाठी सदस्य नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी मसुरे येथे कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत ,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, महिला आघाडीच्या श्वेता सावंत, पूनम चव्हाण, छोटू ठाकूर, संदीप हडकर,सुहास पेडणेकर, राजेश गावकर, बाबू आंगणे, आबा परब, आदिती मेस्त्री, सुजाता पेडणेकर, माया मुणगेकर, मानसी चव्हाण, सचिन पाटकर, राहुल सावंत, सुशांत माने
कोळंब- कांदळगाव येथे उपविभागप्रमुख अमोल वस्त, विजय नेमळेकर, महेश सुर्वे, रणजित परब, मीनल परब, नेहा कांबळी, दीपक परुळेकर, विकास आचरेकर, बाबू पेडणेकर
तोंडवली येथे पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, अनुष्का गावकर, विभागप्रमुख उदय दुखंडे, भाऊ परब, आबा कांदळकर, जगदिश पांगे, नितीन घाडी आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =