दंडवतेच्या कोकण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी नेहमी तत्पर राहावे…

दंडवतेच्या कोकण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी नेहमी तत्पर राहावे…

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर यांचे प्रतिपादन

मालवण

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी खासदार मधू दंडवते यांनी लोकसभेत पाच वेळा निवडून येताना खासदार, अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद अशा अनेक उच्चपपदावर काम केले त्यांचा गांधीवादी व समाजवादी विचार अखंडपणे त्यांच्या सोबत होता. दंडवते यांचा कोकण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी तत्पर असले पाहिजे असे प्रतिपादन बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांनी केले. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी खासदार मधू दंडवते यांची जयंती बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते यावेळी हर्षदा पराडकर, स्वाती पोखरणकर, प्रियांका वाईरकर, समिक्षा हडकर, हर्षाली चव्हाण, प्रतिक्षा हिर्लेकर, प्रतिक्षा गावडे यानी धडपडणारा शाम, तीन पैशाचा तमाशा, मार्टीन ल्यथर किंग या पुस्तकातील लेखाचे वाचन केले. सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर व दीपक भोगटे यानी प्रा. मधु दंडवते यांच्या कार्याची यावेळी ओळख करून दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा