You are currently viewing मालवणातील सोहळा न भुतो न भविष्यती होईल

मालवणातील सोहळा न भुतो न भविष्यती होईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

 

नौदल विभागाच्या ध्वजावरही शिवमुद्रा लावण्याचा निर्णय

 

मालवण :

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, तहसीलदार वर्षा झालटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, माजी उपासभापती राजू परुळेकर, शिवसेना जिल्हा पदाधिकारी बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गावकर, किसन मांजरेकर, नीलम शिंदे, विश्वास गांवकर, हर्षद पारकर, सौरभ ताम्हणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुमुदिनी प्रभू, नौदल, पोलीस तसेच अन्य विभागाचे अधिकारी, शिवसेना, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे ही आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर नौसेना दिन मालवण मध्ये यावर्षी होत आहे ही बाबही महाराष्ट्रासाठी भूषण आहे. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम हे न भूतो न भविष्यती असेच होतील असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेले दोन महिने राजकोट येथे नौदल व शासनाच्या वतीने शिव पुतळा उभारण्याचे काम हाती घेत ते मार्गी लावण्यात आले आहे. येत्या ४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होईल. नौसेना दिन हा पूर्वी दिल्लीत व्हायचा मात्र यावर्षी तो येथे होत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठे अभिवादन आहे. कारण शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक होते. त्यांनी पहिले आरमार सुरू केले. त्याची दखल पंतप्रधानांनी आणि नौदल विभागाने घेऊन नौसेना दिन येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंतप्रधानांचे मी आभार मानत आहे. नौदल विभागाच्या ध्वजावर देखील शिवमुद्रा लावण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची एक दैवी कृपा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंत्री, आमदार, खासदार, नेव्ही, बांधकाम विभाग तसेच सर्व टीमचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =