You are currently viewing झंझावात…!

झंझावात…!

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे सन्मा.सदस्य कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झंझावात…!*

 

शेवटच्या क्षणावर

वाट पाहतोय

रस्ता संपला सरणावर

हळूच जळतोय

प्रत्येक क्षणी सोबत होते

वाटत होते जीवन साथी

आता नुसते सरण जळते

थांगपत्ता ना आवती-भवती

काहूर माजला एकांताचा

दाही दिशा अतोनात

शोधतो पाउलखूणाचा

उगाच इथे झंझावात…!

 

……………………………..

बबनराव वि.आराख

जि. बुलढाणा

७८७५७०१८०६

प्रतिक्रिया व्यक्त करा