*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झाडं..पानगळ ..बहर..ईश्वर..!*
जाईल ही वेळ ..पण
जगणं.. सोडत नाही
निष्पर्ण झालं जरी
ते ..दुःखी होत नाही ..
पानगळीला मुक संमती
मौन.. झाडाचं असतं
मी बहरेल की नाही..तसं
त्याच्या.. मनातही नसतं ..
शिशिर पानं ओढून
जीव हिसकावून घेतो
वा-याशी त्याच प्रेमाने
हितगुज करत राहतो ..
अंगावर येतील हितशत्रू
तो पाया.. पडत नाही
जळला जरी वणव्यांत
पोळला तरी तो..रडत नाही
शुष्क फांद्यांच्या अंगावर
चुकून एक थेंब टपोरा येतो
वेडा होवून… तो संन्यस्त
हवेत हात फेकून वेडा होतो ..
जगणं त्याचं पानगळीचं
प्रेमसावलीच नात असतं
त्यालाही ठावूक नसतं.. ते
ईश्वराच्या पंक्तीत जाऊन बसतं
झाड नव्हे ते… ईश्वरचं ..
नित्यनूतन स्थितप्रज्ञ..इच्छामुक्त
निराकारात मनोहर लावण्यबहर
मंदसे हसून…धरेवर पसरत
प्रतिमांच्या पालवीत..ईश्वर..!!
बाबा ठाकूर
