You are currently viewing रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा शिवतेजनगर येथे उत्साहात साजरा…

रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा शिवतेजनगर येथे उत्साहात साजरा…

“रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा शिवतेजनगर येथे उत्साहात साजरा…*

शिवतेजनगर (चिंचवड) :

अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शिवतेज नगर येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र शिवतेजनगर समिती यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना सहभागी करून घेत विविध उपक्रम राबवण्यात आले. शिवतेज प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, राजे शिवबा युवा मंच आदी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवतेजनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर आणि पंचमुखी हनुमान मंदिर या मंदिरांमध्ये होम हवन, विष्णुसहस्रनाम, भक्ती संगीत अभंगवाणी, गीत रामायण अशा कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला परिसरातील महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रामायणाच्या कथेवर आधारित नृत्य आणि नाटिका सादर करत सांस्कृतिक कार्यक्रममध्ये रंगत आणली. लहान मुले व युवक-युवती रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषा करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. रामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकी मध्ये मोठ्या संख्येने अबाल वृद्ध सहभागी झाले. मिरवणूकीच्या संपूर्ण मार्गावर आणि प्रत्येक घरासमोर रांगोळी त्याचप्रमाणे भगवे झेंडे भगव्या पताका व दिवे लावण्यात आले. विविध चौकात होणारे बारा ज्योतिर्लिंगांचे महिलांनी साकारलेले देखावे लक्ष वेधून घेत होते .
प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या पडद्यावर तिन्ही मंदिरात सर्वांना दाखवण्यात आला. तीन दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता पंचमुखी हनुमान मंदिरातील महाआरतीने झाली. महाआरती संपल्यानंतर सर्वांना सुमारे साडे तीन हजार जणांना पुरणपोळीच्या जेवणाचा स्वरूपात महाप्रसादाचा लाभ घेता आला. परिसरातील नागरिकांकडून उस्फुर्त वर्गणी जमा करत भव्य दिव्य स्वरूपात साजरा झालेल्या आनंद उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवतेज विकास मंच यांचा संयोजनात सहभाग होता.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − thirteen =