You are currently viewing पेढे खायचे “वंश दिव्याचे”

पेढे खायचे “वंश दिव्याचे”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पेढे खायचे “वंश दिव्याचे”*

 

पाहून चेहरा अल्बम मधला

हसत सुटलीस तूही सुसाट

पायरव ऐकून अंगणामधला

होकाराची नाही पाहिलीस वाट

1

झालीस पागल *कॅसेट* ऐकून

सरळ कळवलास होकार मला

खायचे राहिले *दडपे पोहे*

चुटपुट लागली म्हणून मनाला

2

ऐकून रियाज तुझा पहाटेचा

घुसलो महाली चोर पावली

पाल “शिंकली” मनात तरी

कुणीही नाही *शंका घेतली*

3

कदाचित पाहून वेश बावळा

समजले असतील खुळा मला

नाही पाहिला निरखून चेहेरा

आणून सोडले रीयाज महाला

4

गुपचूप बसलो ऐकत *सा*

तासभर गाडी पुढे सरकेना

कळून चुकले पक्की तयारी

निघून आलो घरी बसवेना

5

फक्त ऐकून आवाज हास्याचा

मेल धाडला *कांदे पोह्याचा*

प्रकरण पाहून *खुद्द महाली*

मजकूर कळला आमंत्रणाचा

6

हंसत बसली *तेव्हा पासून*

सांगून थकले सासरे आमचे

*जरी राहिले कांदे पोहे*

पेढे खायचे *वंश दिव्याचे*

7

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा